Saturday, August 28, 2010

स्वच्छंदी ... एक सुरुवात....

स्वच्छंदी ... एक सुरुवात....

हा ब्लोग चालू करताना विचार करत होतो की नक्की कशाने सुरुवात करू??

वाटलं की करावी सुरुवात एका गोष्टीने ... किंवा एखाद्या प्रसंग वर्णनाने ... पण मग वाटल की "स्वच्छंदी" हेच नाव का आणी हा नवा ब्लोग सुरु का करावासा वाटला हेच लिहावं .... म्हणून मग हा प्रपंच ...

स्वच्छंदी ..... साधा अर्थ असा की मनासारखं वागणारा, किंवा हवं ते करणारा .... साध्या शब्दात ... "उनाड" .... बरोबर ना?? ते पण ठीकच आहे म्हणा .... पण माझ्या अनुसार स्वच्छंदी = स्वच्छ + आनंदी.
मानाने स्वच्छ आणी कायम आनंदी असा मी - स्वच्छंदी !!!

बर आता मी हा नवीन ब्लोग का चालू केला?

तशी बरीच कारण आहेत परंतु ज्यांच्यामुळे मी लिहायला प्रवृत्त झालो ती करणे म्हणजे - अनेक विचार, बराच प्रवास आणी त्यात आलेले अनुभव, अनेक मित्र आणी त्यांच्यासोबत जुळलेल्या आठवणी, एक विक्षिप्त मैत्रीण आणि तिचे प्रोत्साहन; आणी हा स्वच्छ उनाडपणा बाहेर काढण्याचे एक साधन ....
असा हा माझा ब्लोग "स्वच्छंदी"

6 comments:

  1. hey devavrat khup chaan lihile aahes :) keep d gud work goin!

    ReplyDelete
  2. thanks pooja... i cant access ur profile... so who's this exactly??

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Dev D...susaaat...keep the good work goin...

    ReplyDelete
  5. अरारारा... राव, तुमच्या आणि माझ्या ब्लॉगचं नाव एकच आहे. ब्लॉग सुरू करताना माझ्याही मनात हेच विचार आले होते. आणि म्हणूनच कुठल्याही विषयाचं बंधन नसलेल्या माझ्या ब्लॉगसाठी ‘स्वच्छंदी’ हेच नाव योग्य वाटलं मला. पण तुमचा ब्लॉग माझ्याआधी सुरू झालेला आहे. मला माहित नव्हतं ‘स्वच्छंदी’ हे नाव आधीच एका ब्लॉगला ठेवलं गेलेलं आहे....

    ReplyDelete
  6. No probs sanket.... i read your blog lil bit... liked it... keep up the good work... sorry English madhye lihitoy karan hya ofc chya laptop var marathi font nahiye :) ne ways... nice to read your blog... best of luck !!!

    ReplyDelete