ती.....पुढेच जात रहाणार....
"काय उद्दामपणा चालंवलाय हा?? मुलीच्या जातीला हे शोभतं का?"
हे संवाद आता तिला नविन नव्हते. आता अशा atmosphere ला बरीच सरावली होती ती. ह्या सगळ्यातून कसे बाहेर पडावे ते ही तिला बरोबर ठाऊक होते. हे सगळं ती enjoy करत होती अशातला भागं नव्हता. परंतू एक बेफ़िकीर व्रुत्ती सोकावत होती तिच्यामध्ये.
फ़ार पुर्वी हे सगळं चालू झालं होतं. पुरूषं आणी स्त्री ह्याची व्याख्या समजण्या आधीचं होऊ लागलेले भेदभाव त्या बाल मनाल समजतं होते. काय चुकंतय हे जरी समजत नसले तरी कहीतरी चुकंतय हे नक्किच जाणवत होतं तिला. एकदा दोनदा तिने प्रयत्नंही करुन पाहीला ह्याबाबत बोलण्याचा. परंतु लवकरंच ती धडा शिकली. आयुष्यातला सगळ्यात पहीला आणी सगळ्यात महत्वाचा धडा. पुरूषं आणी स्त्री ह्याची व्याख्या उमजली होती तिला. दुर्देवं असं की तिच्या मनातील ह्या व्याख्या भविष्यात आलेल्या प्रत्येक अनुभवांनी अजुनच पक्क्या होत गेल्या.
ते वडीलांकडुन ऎकावे लागणारे बोल तिला अजुनही निट आठंवतायत. ते ४ दिवसं बाजुला बसावं लागणं तिला अजुनही बोचंतय. भाऊ बाहेर खेळत असताना तिला करावी लागलेली कामं अजुनही भेडसावतायत. गावाकडुनं आलेल्या काकांचा तो किळंसवाणा स्पर्श अजुनही तिला जाणंवतो. वडीलांना काहीही न सांगु शकल्यामुळे आईच्या कुशित जाऊन ते रडणं तिला अजुन जाणवतय. ओलावलेल्या पापण्या आजही ते ऊत्तरं शोधतायत. सुरुवातीला आईच्या कुशित असताना रडणं थांबायचं नाही. हळुहळु स्वत:च्या दुखा:पेक्षा असहाय्य आईची अगतीकता जास्त बोचू लागली तिला.
आजपर्यंत आलेल्या अनुभवांपेक्षा त्यानंतर विचारलेल्या "असं का?" ना सतत supress केलं गेलं ह्याचा संताप जास्तं होता. प्रसंगांचा राग येण्यापेक्षा आता जिवनाचा विट येऊ लागलेला. हळुहळु मनं कठोर होत गेलं. अश्रु सुकुन गेले. फ़ुटकळं रागाची व संतापाची जागा आता अंतर्मनातल्या वादळाने घेतलेली. मनं बंड करायला प्रव्रुत्त झालं.
हे वादळं, हा आक्रोश बाहेर पडू लागला. चुकिच्या मार्गानेच का होईना, पण बाहेर पडायला लागला. मग रेल्वेच्या प्लेट्फ़ोर्मवर चुकून लागलेल्या धक्यालसुद्धा सणसणीत थोबाडीत मारुन उत्तर दिले जाऊ लागले. का कोणास ठाऊक, पण पुरुष जातीबद्धलं एक तिटकारा मनात निर्माण झाला. खरंतर तिला ही college मधील "तो" फ़ारच CUTE वाटला होता. पण तिच्या "त्या" काकांच्या किळसवाण्या "प्रेमा" मुळे परत एकदा तिचे मनं फ़ार लांब निघुन गेले. मनाने हे generalize केलं कि सगळेच पुरुष Assholes असतात. College मधील "त्या" ने बराच प्रयत्न केला हिचे मनं समजण्याचा. पण हिने मनाचे दरवाजे ईतके घट्टं बंद करुन घेतलेले की कोणालाही त्यात डोकाऊन पहाणे शक्यचं नव्हंते. "त्या" ने Propose केल्यावरं तिने मारंलेली कानफ़टात जरी "त्या" च्या गालावर बसली होती तरी अश्रु मात्रं तिच्या डोळ्यात दरपळंले होते. मनात कुठेतरी वाटंत होतं की त्याने थांबावं, परत विचारावं, एकदा वळूनं पहावं. नाही थांबला तो. आणी हिचे मनं अजुनचं कठोरं होतं गेलं. आक्रोश वाढू लागलेला.
अंतर्मनातल्या ह्या आक्रोशाला शांत करण्यासाठी मग इतर उपाय केले जाऊ लागले. कोणत्याही माणसापेक्षा दारु आणी सिगारेट अधिक जवळंची वाटू लागली. मनातील वादळं शांत करण्यापेक्षा खोट्या उसन्या साधनांच्या मदतीने ते neglect केले जाऊ लागले. खर्या जगापेक्षा ही मोहाची, नशेची दुनिया अधीक भावु लागली. बेफ़िकीर व्रुत्ती वाढू लागलेली. "इतकी वर्ष माला तुमचे ऎकावे लागले, आता तुम्ही म्हणाल त्याविरुद्धच वागते मी" ही भावना जोर बळंकाऊ लागलेली. एक विक्षिप्त आनंद मिळू लागलेला. मनातल्या Emotions ची जागा आता फ़क्तं शारिरीक गरजांनी घेतलेली.
ह्या सगळ्याची जाणीव नक्कीच आहे तिला. आजही कधी कधी मध्येच थांबुन पहाते ति इकडे तिकडे. आजही कधी कधी भिजते ती पावसात. आजही कधी कधी वाटंतं तिला, की बागडावं छान मुक्तं पक्षासारखं. आजही कधी कधी वाटतं तिला की म्हणावं कोणीतरी "फ़ार छान दिसत्येस आज तू."
आजही कधी कधी थांबते ती नागमोडी वळणावरं. मागे वळून पहाते. कळंतय तिला तिची वाट चुकली आहे ते. पण आता ती मागे परत फ़िरू शकत नाही. किंबहूना परत मागे वळण्याची ईच्छाच नाहीये तिची. जरी पुढे अंधार दिसतोय तरी ती पुढेच जात रहाणार.... त्या खोल अंधाराकडे..... नसलेल्या आशेकडे....एका अंताकडे.... किंवा एका नव्या सुरुवातीकडे.....
DD Darling... tu dhakkyanvar dhakke detoyas..
ReplyDeletei couldn't realize u are so sensitive..
now I am wondering how did this happen ..
some words are v v appropriate .. how could u write those????
too good ya...too good!!!
यार... जाम भारी लिहिले आहे..
ReplyDeleteसुसाट !!!!!!!!! जळतोय मी तुझ्यावर ...
मला नक्की तुझ्या लिखाणाचे पुस्तक छापायला आवडेल...
आता तुझ्या या लिखाणामागच्या सुरुवातीची "स्फूर्ती कथा" वाचायला आवडेल....... कधी लिहितो आहेस?
प्रिय डी डी,
ReplyDeleteकसे जमवलेस रे सगळे शब्द?
आर्त पण हळुवार? हृदयापर्यंत खोल जाणारे तरी स्पष्ट अन तरल!
खर सांगू तू इतके छान लिहितोयस याच्यावर विश्वासच बसत नाहीये
Jiyo yaar.....
छान लिवलंय. आवडलं बुवा आपनास्नी. :-)
ReplyDelete